Wednesday, April 11, 2007

पुतळाप्रिय समाज आणि विटम्बनाप्रिय समाजकंटक

उपाय काय?

मुंबई, ता.१० - जालन्यात आज झालेल्या पुतळा विटंबनेच्या प्रकारावर उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. ""राज्यात पुतळे उभारताना संबंधितांनी राज्य सरकारची परवानगी घ्यावी किंवा पुतळ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतःच उचलावी,'' असे प्रतिपादन त्यांनी आज विधान परिषदेत केले. .......जालन्यातील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे त्यांनी सांगितले. जालन्यातील घटनेबाबत विधान परिषदेत
निवदेन करताना श्री. पाटील बोलत होते. राज्यात बेकायदेशीररीत्या उभारलेल्या पुतळ्यांचे सरकार सर्वेक्षण करणार आहे, असे सांगून ते म्हणाले, ""सध्या राज्यात ठिकठिकणी बेकायदेशीररीत्या पुतळे उभारले जात आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणीच उचलत नाही. एखाद्या पुतळ्याची विटंबना झाली, तर त्यातून कायदा व सुव्यवस्था स्थितीचा प्रश्‍न निर्माण होतो. राज्यातल्या सगळ्या पुतळ्यांना संरक्षण पुरविणे सरकारला शक्‍य नाही. त्यामुळेच पुतळे उभारणाऱ्यांनीच त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलली पाहिजे.'' ""यापुढे पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांअगोदर पुतळे उभारणारांनाच जबाबदार धरले जाणार आहे, तसा नियम केला जाणार आहे. यासाठी ज्यांनी पुतळे उभे केले आहेत, त्यांनीच पुतळ्यांची योग्य ती देखभाल करावी.''

3 comments:

Unknown said...

सर्वात सोपा उपाय!
आजकाल आपल्या देशांत उभारलेल्या अनेक पुतळ्यांची विटंबना करण्याचे प्रसंग वारंवार घडतात व त्यानंतर भावनांचा उद्रेक झाला की समाजकंटक दगडफ़ेक व दंगली घडवून आणतात ज्यामध्ये राज्याचे,देशाचे व लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.पोलिसांचे मनुष्यबळ पण यात विनाकारण वाया जाते व कायदा व सुव्यवस्था स्थितीचा गंभीर प्रश्‍न निर्माण होतो.
असे होउ नये यासाठी
१)हे सर्व पुतळे सार्वजनिक ठिकाणे,रस्ते येथून सुरक्षीत पहारा असलेल्या संग्रहालयांत हलवावेत.
२)बेकायदेशीररीत्या पुतळे उभारणा-या लोकांना कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी व त्यांना ते त्यांच्या खाजगी जागेत ताबडतोब हलवायला लावावेत.
३)यापुढे कुठल्याहि सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारायला कुठल्याहि पक्षाला वा व्यक्तीला परवानगी देउ नये.
४)नवीन कायदा करून दूरचित्रवाहिन्यांना व आकाशवाणीला अशा घटनांचे प्रक्षेपण करण्याची सक्त मनाई करावी!
५)महात्मा गांधी,डौ.आंबेडकर,पं.नेहरू या थोर नेत्यांचे पुतळे आजच्या अति प्रदुषणयुक्त जगात उन्हातान्हात धूळ,वारा,पाउस,अतिउन यांचा मारा कायम सहन करत उघड्यावर उभे असतात.वर्षातून एखाद्या जयंतीवेळीच त्यांची आठवण येते जेव्हा ते साफ़ केले जाउन त्यांच्यावर हारतुरे चढवले जातात.त्यांना संग्रहालयांत हलवल्यास त्यांची चांगली देखभाल होइल व समाजकंटकाना विटंबना करणे अशक्य होइल!
सुभाष भाटे

Janhavi said...

Thats true.. People who make statues should be held responsible.
and there should be limit for statues build in a city. The Law should be more strict in such cases. But everything is in the hands of people. They should become more socially responsible. If all this is going to happen, the concept of statues should be abolished now onwards.

Anonymous said...

I would tend to agree with capt.Subhash Bhate,whose solution is most practical & not based on emotions.Neither the govt nor even private parties or individuals will ever be in a position to guard any statues throughout day & night in the whole year!
Any miscreant or political detractor or even any mentally deranged mischief monger hell bent on mischief can easily desecrate any statue without being found & that is good enough in our country for the flames of passion to ignite, burning everything around in the thoughtless inferno!Recent examples are the burning of Deccan Queen just because someone in faraway Kanpur damaged Dr.Ambedkar's statue.
Besides,today,we hardly have visionary leaders of the same stature of the eminent freedom fighters & we could do away permanently with erection of statues in public places for good.