Wednesday, February 14, 2007

फुकट्या रेल्वे प्रवाशांत लालूंचे सासू-सासरेही!


रेल्वेचा तोटा कमी करण्यासाठी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून दंडवसुली यांसारखे उपाय व्याख्यानांतून सुचविणारे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आता पकडणार तरी कोणाकोणाला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे! कारण फुकटात रेल्वे प्रवास करताना, साक्षात राबडीदेवींचे आईवडील म्हणजेच लालूंचे सासू- सासरे नुकतेच पकडले गेले. त्यांना दंडही करण्यात आला. ....
बिहारमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. संपर्क क्रांती एक्‍स्प्रेसमध्ये हाजीपूर व सिवानदरम्यान फुकट्यांच्या मागावर असणाऱ्या एका "दक्ष' तिकीट तपासनीसाने दाम्पत्यास पकडले. तिकीट नसतानाही ते आपल्या घरचीच गाडी असल्याच्या थाटात पहिल्या वर्गाच्या डब्यात चढून बसले होते. त्यांच्याजवळ तिकीट नसल्याचे स्पष्ट होताच छपरा रेल्वेस्थानकावर त्यांना उतरवून दंडवसुली करण्यात आली. मात्र दंडाच्या पावतीवरील नावे पाहिल्यावर आणि त्यानंतर हे आजी-आजोबा "कोणाचे कोण' आहेत, हे कळल्यावर संबंधित टीसी व पोलिसांचेच डोळे पांढरे होण्याची वेळ आली! काही मिनिटांत सारे स्थानकच जणू आजी-आजोबांच्या मागे मागे सेवेसाठी धावू लागले. याबाबत रेल्वे पोलिस सध्या काहीही बोलत नाहीत. मात्र ज्या तिकीट तपासनीसाने लालूंच्या फुकट्या सासू सासऱ्यांना पकडण्याचा "अपराध' केला, त्याच्या नोकरीची स्थिती "बिकट' असल्याचे कळते.

From Sakal News Network on eSakal.com

1 comment:

Madhavrao said...

This appears to be a publicity stunt.