Saturday, January 20, 2007

Party Or State?


Very basic question - Is Vilasrao Deshmukh the Chief Minister of Maharashtra or Is he just a leader of Congress party? The reason this question is apt is this news on eSakal-

मुख्यमंत्र्यांचा स्वित्झर्लंड दौरा अखेर रद्द

मुंबई, ता. १९ - ...परदेश दौऱ्यावर जाण्याऐवजी महापालिका निवडणुकांमध्ये कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारकार्यात सहभागी व्हा, असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्याने मुख्यमंत्र्यांना आपला स्वित्झर्लंड दौरा रद्द करणे भाग पडले आहे.

...दरम्यान, दावोसला होणाऱ्या जागतिक परिषदेत तब्बल १२ वर्षांनंतर सहभागी होण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली होती. २४ जानेवारीला सकाळी महाराष्ट्राच्या वतीने जगभरातील उपस्थित नामवंतांना "ब्रेकफास्ट' दिला जाणार होता. त्या वेळी राज्यातील गुंतवणूकविषयक संधींबाबत महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्री सादरीकरण करणार होते; परंतु त्यांचा दौरा रद्द झाल्याने आता महाराष्ट्राची बाजू कोण मांडणार, असा सवाल निर्माण झाला आहे.

2 comments:

Unknown said...

Party or state?
साध्या नगरपालिकांच्या निवडणुकींना व प्रचाराला आजच्या मतांच्या,जातींच्या व पैशाच्या राजकारणामुळे इतके असाधारण महत्व प्राप्त झाले आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना १२ वर्षांनी दावोसला होणा-या जागतिक परिषदेत सहभागी होण्याची आलेली संधि पक्षश्रेष्ठींच्या संकुचित मनोवृत्तीमुळे सोडून द्यावी लागली! २ दिवस मुख्यमंत्री दावोसला असते तर काय फ़रक पडला असता?
कुठल्याहि पुढा-याला ठराविक मर्यादेपलीकडे कामाचे श्रेय न मिळू देण्याच्या वा वर न येउ देण्याच्या कोंग्रेस पक्षाचे हे कायमचे धोरण देशाला व राज्यांना मात्र नक्कीच मारक ठरत आहे कारण 'हाय कमांड'चे श्रेष्ठत्व कायम राहिले पाहिजे.इंग्रजांची 'divide & rule'ची निती स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे होउनसुध्धा चालू आहे हे देशाचे/महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे व पाहून खेद वाटतो!
सुभाष भाटे

Chintamani Thakur said...

Once you become a Chief Minister, you are a CM of the state, not of the Party.