Monday, January 08, 2007

3 News!

These are the 3 news on eSakal.com. Watch out for the similarities and contradictions -

"'एसईझेड'विरोधी आंदोलनात सहा शेतकरी ठार, २५ जखमी

नंदीग्राम, ता. ७ - पश्‍चिम बंगालमध्ये "एसईझेड'विरोधी आंदोलनाला आज हिंसक वळण लागून, पूर्व मिदनापूर जिल्ह्यात नंदीग्राम येथे सहा शेतकऱ्यांचा बळी गेला. "एसईझेड'अंतर्गत इंडोनेशियाच्या सलीम ग्रुपने उद्योग उभारण्याकरिता शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून हे आंदोलन पेटले आहे.


उल्फा'चा हिंसाचार सुरूच; शुक्रवारपासून ६३ ठार

गुवाहाटी, ता. ७ - हिंदीभाषक पट्ट्यामध्ये "उल्फा'चा हिंसाचार सुरूच असून, रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार चार वेगवेगळ्या घटनांमध्ये अतिरेक्‍यांनी १५ जणांना ठार केले; तर १० जणांना जखमी केले.


'नवा भारत' हा अफाट संधींचा प्रदेश - पंतप्रधान


नवी दिल्ली, ता. ७ - ...अनिवासी भारतीयांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या "प्रवासी भारतीय दिवस' या संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. सिंग बोलत होते. यंदाचे हे पाचवे संमेलन असून, "रुटिंग फॉर द रुट्‌स' असे त्याचे शीर्षक आहे.

सध्याचा भारत हा "नवा भारत' असून, अफाट संधींचा हा प्रदेश आहे, असे मायभूमीचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले, ""देशात आता प्रत्येक भारतीयासाठी उत्तम संधी निर्माण केल्या जात आहेत आणि प्रत्येकाला आपले सर्वोत्तम काम करता यावे, असे वातावरण निर्माण होत आहे. याचा लाभ अन्य देशांत स्थायिक झालेल्या भारतीयांनी घ्यावा.''

No comments: