Is This Hypocracy? Or Just Politics?
पवारांशी असलेल्या जुन्या मैत्रीचा दाखला देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापुढे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला। याआधीच आम्ही एकत्र आलो असतो, तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे घडले असते व पवार पंतप्रधानही होऊ शकले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली...
शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचा महापौर झाल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना बाळासाहेब म्हणाले, की शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करण्याला आपला विरोध नाही. याआधीही पवारांकडे याबाबत विचारणा केली होती. पवारांपुढे मैत्रीचा हात पुढे केला होता; मात्र त्या वेळी त्यांनी आपल्या सूचनेकडे दुर्लक्ष केले होते. पवार हा उमदा माणूस आहे; मात्र ते कधी काय डावपेच खेळतील हे सांगता येत नसल्याचेही ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादीशी युतीबाबत भाजपला विश्वासात घेतले होते का, असे त्यांना विचारले असता आपण सगळ्याच गोष्टी भाजपला विचारून करीत नाही, असा टोला त्यांनी लगावला..