वीजप्रश्नात सुशिक्षितांनी लक्ष घालावे
* Blogger soppy said...
"पॉलिटिक्स बोगस आहे, त्यात उतरून ते बदलले पाहिजे..." ही एक ओल खुप कही सांगून जाते. संदीपच्या व्येथा वाचल्या, त्यात त्याने खुप सरळ आणि निरागस मते मडली आहेत. एक म्हण आहे ," घान साफ करायची असेल तर घनिमधे उतरले पाहिजे", खरच आता घान साफ करण्याची वेळ आली आहे. मी मराठवाड्यातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावाहून आहे, आणि सध्या आय टी मुंबई मधे उच्य शिक्षण घेत आहे. घरी शेती आहे, लाइट ६ तास आणि लोड शेडिंग १८ तास......!!! विज कधिपन रात्रि अपरात्री येते, आणि शेतकरी त्या त्या वेळेस उठून शेतात जातात. दिवसा काम अन रात्रि झोप नहीं. एकीकडे शौपिंगा मोल मधे विजेचा झगमगाट आणि एकीकडे शेतकर्यांच्या आत्महत्या!! गावातील जेष्ठ नागरिक म्हणतात की इन्ग्रजांच राज्य तरी बारे होते......!!! ह्याचा काय अर्थ आहे? आता तुमच्या माझ्या सुशिक्षितानी राजकारणात लक्ष्य घालण्याची वेळ आली आहे, ही घान साफ करण्याची वेळ आली आहे... Sopan Mahadeo Phapal M.Pharm (Nagpur),
PhD Department of Chemical Engg,
IIT Bombay, Powai-400076
Email-sopan_phapal@yahoo.co.in
सोप्पी यांच्याप्रमाणेच आमच्या ब्लॉगवाचकांच्या प्रतिक्रिया आणि मूळ विषय वाचा ई- सकाळवरील ब्लॉगवर... तसेच आपल्या प्रतिक्रियाही नोंदवायला विसरू नका.
3 comments:
राहून राहून एका गोष्टीचे आस्चर्य वाटते की सकाळ वा पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर कालच्या व आजच्या "मराठी विरुद्ध परप्रांतीय" वादाच्या सर्वात मोठ्या घटनांबद्दल वेबसंपादकांकडून अपेक्षित एक विषय म्हणून सोडाच,तर एक शब्दसुद्धा लिहिला जात नाही,पण "वीज प्रश्नात सुशिक्षितांनी लक्ष घालावे" या आधीच्याच विषयावर मात्र दोन्हीकडे पुन्हा प्रतिक्रिया मागविल्या जातात???
हा विषय निरनिराळ्या पातळ्यांवर पुन्हापुन्हा प्रकाशित झाला आहे,त्याबद्दल अख्खा महाराष्ट्र रोजच्या अनुभवाने जाणतो आहे,पण परिस्थिती कधीच सुधरत नाही,तरी "सकाळ" या मंत्र्यांच्यावर बहिष्कार टाकायच्याऐवजी गरज नसतांना त्यांना भाव देवून त्यांच्या बातम्या/फ़ोटो अजुनहि छापत आहे!खुप झाले हे लांगुलचालन!यांची लायकी पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची आहे!
कोंग्रेस व NCP च्या विरुद्ध कुठलाहि गैरसोयीचा विषय वा आवाज सकाळ उठवत नाही,पण MNS,SS वगैरेंचा पाणउतारा करणा-या गोष्टींची दखल घेतो!
महाराष्ट्राचे हेच दुर्दैव आहे की सर्व पातळ्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले,दिल्लीवरून कठपुतळीसारखे वागवलेले/नाचवलेले सरकार अजुनहि खोटा दिखावा करत आहे,मराठी माणसांच्या भावना पायदळी तुडवत आहे व मुंबई व इतर शहरे परप्रांतीयांच्या कारस्थानात बळी पडू देत आहे!
इथले मुख्यमंत्री असो किंवा इतर मंत्री असो,तसेच दिल्लीतले मराठी मंत्री एक शब्दाने म्हणू शकत नाहीत की "परप्रांतीयांची टुरटुर फ़ार झाली,ते आमच्या लोकांच्या नोक-या हिरावून घेत आहेत व हे थांबलेच पाहिजे!" हेच कां राज्यकर्ते मर्द मराठे???
पण त्याउलट हे लालू प्रसाद,अमरसिंग,अबु आझमी यांची अररावी मुकाटपणे सहन करत मराठी माणसांचीच गळचेपी करत आहेत!!!
Bloody shame on them!
सर्वप्रथम श्री.सोपान फ़फ़ळ यांनी हा विषय व त्याबद्दलचे कटू सत्य सकाळच्या माध्यमातून वर काढले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो! राजकारणातील ही घाण इतकी खोलवर गेलेली आहे की तिचे मुळापासून उच्चाटन करणे अतिशय कठिण गोष्ट आहे! त्याकरता सर्व तथाकथित फ़ुकट्या मान्यवरांना राजिनामा द्यावा लागेल किंवा निवडणुकांत त्यांचा पराभव करून त्याना तडीपार करावे लागेल!
जरी खालील प्रतिक्रिया या विषयाशी सुसंगत नाही तरी सकाळ वा पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर राजचे आंदोलन यावर लिहित नाही म्हणून येथे काल दूरचित्रवाणीच्या निरनिराळ्या वाहिन्यांवर श्री.राज ठाकरेंच्या अटकेच्या व त्यांच्या समर्थकांच्या ठिकठिकाणी चाललेल्या निदर्शनांची चित्रीत वार्ता पाहतांना असे वाटले की इंग्रजांच्या राज्यात जसे भारतीय पोलिसच इंग्रजाच्या आदेशानुसार भारतीयांवरच अश्रुधूर,लाठीमार,प्रसंगी गोळीबार करत असायचे हुबेहुब त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील पोलिस मराठी राज्यकर्त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत मराठी लोकांच्यावरच बेछूट लाठीमार करत सुटले होते! यालाच काय स्वराज्य म्हणायचे? समर्थकांना इतके भडकविल्यावर जाळपोळीचे चूकीचे पण उत्स्फ़ुर्त भावनापूर्ण प्रतिसाद उमटणारच!
कित्येक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानानंतर ६१ वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी आज आपलेच राज्यकर्ते राजकीय स्वार्थाकरता सर्वत्र जातधर्म वगैरेंच्या आधारावर आग लावत आहेत व आपल्याच पोलिस दलाचे खच्चीकरण करत आहेत!
महाराष्ट्रातला एकाहि राज्यकर्त्या माईच्या लालाची हिंमत नाही निधड्या छातीने रोखठोकपणे म्हणायची की महाराष्ट्रात जे नवे परप्रांतीय येत आहेत त्यांनी येथे कित्येक वर्षांपासून स्थायिक व समरस झालेल्या जुन्या परप्रांतीयांसारखे गुण्यागोविंदाने रहावे,येथे ९० टक्के प्राधान्य फ़क्त मराठी किंवा जुन्या महाराष्ट्रियन व्यक्तीनाच दिले जाइल व इतरांचे अर्ज सरसकट फ़ेटाळले जातील!
पण हे माईचे घाबरट लाल दिल्लीदरबारातील परप्रांतीयांना इतके घाबरतात की त्यांच्यात असा एक शब्द उच्चारायची हिंमत नाही.
महाराष्ट्राचा खरा अभिमान असता तर यातील एखाद्या तरी मंत्र्याने स्पष्ट शब्दात मराठी माणसांचीच बाजू घेतली असती व वेळप्रसंगी राजिनामासुद्धा दिला असता! पण सत्तेसाठी हपापलेले हे मिंधे काय असे करणार?
केंद्रिय गृहमंत्र्याचे कालचे लोकसभेमधील भाषण मराठी माणसाला लाज वाटेल असे होते! अशीच भाषणे ते प्रत्येक बांबस्फ़ोटात कित्येक व्यक्तींचा हकनाक मृत्यु झाल्यानंतर देतात!
आणि अतिशय अनुभवी पण कायमचे कोंग्रेस अध्यक्षांच्या दबावाखाली असलेले कृषीमंत्री महाराष्ट्रातील खरी परिस्थिती पूर्णपणे माहिती असूनहि दूरदृष्टीपणाने आपली खुर्ची आजन्म पक्की करण्याच्या इराद्याने मराठी माणसांच्या बाजूने एक शब्दहि न उच्चारता मौनव्रत बाळगणे पसंत करतात व आपल्या खासदार कन्यारत्नेला दूरचित्रवाणीच्या वार्तांहरांशी परप्रांतीयांचाच पुळका जाहिर करायला लावतात!
C.Y.Games च्या शेवटच्या दिवशीची शिसारी येणारी भाषणे ऐकून वाटले की हे मंत्री/नेते एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत तर होतेच,पण कोंग्रेस अध्यक्षांना दूरूनसुद्धा "मस्का" लावण्याची संधी सोडत नव्हते, जसे काय हा समाप्ती सोहळा म्हणजे चमच्या कोंग्रेस व NCP कार्यकर्त्यांचाच मेळावा होता!!! लाचारीच्या या कळसाची किळस आली!
काल ज्या तर्हेने वर्दीवाले तमाम पोलिस आपल्याच सर्व मराठी बांधवांच्यावर लाठ्या व जाळीच्या ढाली हातात धरून अमानुषपणे हल्ले करत होते ती दृष्ये पाहून आपण पुन्हा ब्रिटिशांच्या राजवटीतल्या महाराष्ट्रात गेलो आहोत असे वाटत होते!
काय भावना असतील या बिचा-या वर्दीवाल्या पोलिसांच्या? कोण हे आले राज्यकर्ते त्यांना असे करायला प्रवृत्त करणारे?
राजने एक शब्दहि उच्चारला तर त्यावर बंदी व अटकेची धमकी व या मुर्ख राज्यकर्त्या नेत्यांनी त्यांची थोबाडे उघडून कांहीहि बोलले तर त्याला कायद्याचे संरक्षण?
हा कुठला न्याय झाला? पोलिसांनीपण यापुढे असले मुर्ख हुकुम मानायचे कां याचा विचार करायला पाहिजे!
Good job captsubh! I agree 100% to your thoughts.I am not supporter of MNS.I have read a recent news that demand of charging a murder of a bihari boy in mumbai by his father.Plz anyone confirm the following news published in times of india( page3, 21oct2008)-which is true or false(because i haven't read that news) & hand it over to Government or police or MNS's authority to save raj from this case. The news in times of india says that that person was killed in an accident near railway line.
Post a Comment