Sunday, October 19, 2008

"वर्दी'ची अस्वस्थता

पोलिस दलात अधीक्षक- उपायुक्त पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या राजकीय हेतूने प्रेरित असतात. मनगटशहांवर, तसेच मंत्र्यांचे स्वीय सहायक, कर्मचारी, आदींवर कारवाई करताना दबाव आणला जातो. आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना हात लावणे शक्‍य नसते. ठाणे व धुळे येथील दंगलीत विनाकारण पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. सुदैवाने ती कारवाई झाली नाही. पण, पोलिसांना आपल्या हातातील बाहुले बनविण्याची राजकारण्यांची वृत्ती वारंवार प्रत्ययास येते.

महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातील हे चित्र असेल, तर बिहार, उत्तर प्रदेशात काय स्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाही. अलिकडेच मोठ्या शहरांत झालेल्या बॉंबस्फोटानंतर देशभर चिंतेचे वातावरण होते. तपास सुरू झाल्यावर पोलिसांना, सुरक्षा दलांना आपले काम करू देण्याऐवजी राजकारण्यांनी लुडबूड सुरू केली.

याबाबत मेजर जनरल (निवृत्त) शशिकांम पित्रे म्हणाले, पोलिस दलाकडे एखादी कामगिरी दिली जाते, तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी आणि निर्णयाचे स्वातंत्र्य त्या दलाला दिले पाहिजे. त्यांच्यावर सोपविलेल्या उद्दिष्टाविषयी संदिग्धता असता कामा नये.

आपले काय मत आहे. वरील परिस्थितीचा साकल्याने विचार केल्यास पोलिसांवरील जबाबदाऱ्या आणि त्यांच्यामधील हस्तक्षेप वाढत असल्याचं लक्षात येतं. पोलिसांच्या वर्दीतील अस्वस्थता देर करण्यासाठी राजकीय नेते, कायदेमंडळ, न्याययंत्रणा, प्रशासकीय अधिकारी या सर्वांनीच एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. कारण त्यावरच एकूण समाजाचे हित अवलंबून आहे. आपल्या प्रतिक्रिया इथे जरूर मांडा.

10 comments:

Niteen Deshpande said...

This case is not only with Police officer but all govt departments. Not only in case of Class I or Class II but happens with Class III employees also. I am the Sufferer of the Same. My transfer order is issued on 31/05/2008 till date not relived me only under Political Pressure.

Niteen Deshpande
Craft Instructor,
Industrial Training Institute,
Jintur Dist:Parbhani

Anonymous said...

you mention that reaction should not be abusive. MR. prataprao pawar, here now a days word politician itself is worst than abuse, how a reaction can be free of abuse?

so needless to say that you will not publish the reaction which are coming out from heart.

am i right, mr editor?

Unknown said...

"पोलिसांच्या वर्दीतील अस्वस्थता दूर करण्यासाठी राजकीय नेते, कायदेमंडळ, न्याययंत्रणा, प्रशासकीय अधिकारी या सर्वांनीच एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत" हे कितीहि खरे असले तरी जर त्यांनी आपापल्या जबाबदा-या सक्षमपणे संभाळल्या असत्यातर ते कांही या सर्वांना वेगळे सांगण्याची गरजच नसती!!!

या विषयात नवीन कांहीच नाही.कित्येक वर्षांपासून पोलिसांच्या नेमणुका,त्यांचे कार्य यात व सर्वच खात्यांत सतत राजकीय हस्तक्षेप चालू आहे.सर्व सरका्री कचे-यांच्या अकार्यक्षमपणाचे हे एक मुख्य कारण आहे.

वाढलेल्या चो-यामा-या,दरोडे,खून,दहशतवाद्यांचे हल्ले,राजकारण्यांनी पुकारलेली निदर्शने या व अनेक कारणांमुळे पोलिस खात्यावर प्रचंड भार आला आहे,पण कायद्याप्रमाणे गुन्हेगारांना पकडून खटले भरण्याचे स्वातंत्र्य पोलिसांना या राजकीय हस्तक्षेपामुळे मिळणे कठिण झाले आहे!

Charity begins at home या म्हणीप्रमाणे सत्ता गाजविणारे राजकीय नेते यांनी आदर्श घालून द्यायचे असतात व सर्वजण नियम पाळतात की नाही याकडे काटेकोरपणे लक्ष द्यायचे असते.
पण सर्व नेते स्वतःची पोळी भाजण्यात व्यस्त असल्यामुळे स्वतःचे उत्तरदायित्व व जबाबदा-या पूर्णपणे विसरले आहेत.

पोलिसदलात यामुळे एक दिवशी बंड झाले तरी ते नवल नसेल.राजकारण्यांच्या हितसंबंधीनी किंवा पक्षकार्यकर्त्यांनी कुठलाहि गुन्हा केला की त्यांना हे पुढारी पोलिसच्या कचाट्यात अडकू देत नाहीत हे अतिशय निंदनीय आहे.आपल्या लोकशाहीचा हे मतांध राजकारणी असा फ़ायदा का घेत आहेत?

वास्तविक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे गृह खाते सक्षमपणे व प्रामाणिकपणे चालवितात अशी त्यांची ख्याती आहे व त्यांच्यांबद्दल मलाहि आदर आहे,तरी कांहीतरी मुरते आहे, ज्यामुळे ही बातमी आजच्या सकाळमध्येपण प्रसिद्ध झाली आहे!!!

पोलिसांचे मनोधैर्य व मनोबळ वाढवलेच पाहिजे व त्यासाठी राजकारण्यांनी प्रथम ढवळाढवळ थांबविली पाहिजे!

Anonymous said...

मला नाही वाटत पोलिसांमध्ये बंडाळी माजेल, कारण जो माणुस वशिलेबाज नाही त्यालाच ह्या हस्तक्षेपाचा त्रास होत असेल.
कुठल्याहि खात्यात अशी माणसे संख्येने नेहेमीच कमी असतात त्यामुळे बंड होऊ शकत नाही व आदर्शवादी असल्यामुळे बंड करण्याचा विचारसुद्धा ही माणसे मनात आणत नाहीत.

अशा हस्तक्षेपाचे दुरगामी परिणाम म्हणजे स्वत:मध्ये अधिक मिळवण्याची कुवत असूनसुद्धा देशभक्ती ह्या एकाच कारणासाठी कमी पगारावर जे पोलिस आणि सैन्यात भरती होतात त्यांची संख्या कमी होत जाईल आणि ह्याचे परिणाम सामान्य जनतेला व राजकारण्यांना भोगावे लागतील.(खरे सांगायचे तर सामान्य जनता आता ह्याला सामोरी जात आहे प्रश्न उरला फक्त राजकारण्यांचा)

तोपर्यन्त 'सकाळ' तुमच्याकडे अशी काय शक्ति आहे की आम्ही आमचे मत व्यक्त केल्यावर हे सगळे रातोरात बन्द होईल?

Unknown said...

पोलिसखात्यात व लष्करात काम करणा-या व्यक्तीना पोलिस वा आर्मी Act बंड करण्याचे स्वातंत्र्य देत नाही हे जरी खरे असले तरी या व्यक्तीपण माणुसच असतात व त्यांच्या मनातपण अन्यायाबद्दल तिरस्कार सर्वसामान्य माणसाइतकाच असतो.

कायम प्रतिकुल परिस्थितीत झगडावे लागत असल्यामुळे,VVIP च्या संरक्षणासाठी तासंतास ड्युटी करावी लागत असल्यामुळे तेहि कंटाळलेले आहेत.दहशतवादाच्या घटना असोत वा नैसर्गिक आपत्तीच्या घटना असोत,सामान्य माणसाला दूर पळून जाण्याचे आवाहन करण्यात येते,पण पोलिस वा लष्करालामात्र घटनास्थळी त्यांचे जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करण्यासाठी पाचारण करण्यात येते!

संकट टळल्यावर चांगली वेषभुषा करून दूरचित्रवाणीच्या कमेरांसमोर मंत्रीमहोदय वा पक्षाध्यक्षा हजेरी लावणार व पुढच्या निवडणुकांवर डोळे ठेवून घोषणा करणार व थोडीफ़ार पैशाच्या रुपाने मदत करणार यापलिकडे कृती शून्य! त्यावेळी यांना पोलिसखात्याबद्दल lip service सोडून बाकी काहिहि म्हणायचे नसते!

दहशतवादात इतके लोक मारले गेले तरी फ़ारच थोडे अतिरेकी जाळ्यात सापडणार व एखादा अल्पसंख्याक Encounter मध्ये मारला गेला तर त्याच्याबद्दलच सहानुभुती दाखविली जाणार!
मात्र जेव्हा बेडर पोलिस ओफ़िसर कै.शर्मांसारख्याचा बळी जातो तेव्हा महामुर्ख राजकारणी त्यालाच दोषी ठरविणार!

काय वाटत असेल इतर पोलिसांना?
संसदहल्ल्याकरता शिक्षा झालेला अतिरेकी याला फ़ाशी देण्यात होणा-या अक्षम्य दिरंगाईमुळे चिडलेल्या धारातिर्थी पडलेल्या सुरक्षारक्षकांच्या परिवारांनी त्यांना बहाल केलेली मरणोत्तर पदके सरकारला परत केली तरी निर्लज्ज सरकार तितकेच थंड?

या सरकारने देशवासियांचा घात केला आहे व एक दिवशी सशस्त्र दलांचे बंड झाले तर त्यात नवल असणार नाही! त्यांच्याहि सहनशक्तीला मर्यादा आहेत!
Do not make the mistake of always taking them for granted [& for a ride!!!]

जरी सर्व वृत्तपत्रे व TV channels कुठल्यातरी पक्षाचे मिंधे असले तरी देशाचा महत्वाचा पंचस्तंभ म्हणून देशाच्या रक्षणासाठी त्यांच्यावर निपक्षपातीपणेच वर्तन/लिखाण/प्रसारण करण्याची जबाबदारी आहे हे ते बरेचदा विसरू लागलेले दिसत आहेत! ही मनस्थिती/परिस्थिती जेव्हा सकारात्मक बदलेल तेव्हा चित्र वेगळे दिसू शकेल!!!

Unknown said...

काल दूरचित्रवाणीच्या निरनिराळ्या वाहिन्यांवर श्री.राज ठाकरेंच्या अटकेच्या व त्यांच्या समर्थकांच्या ठिकठिकाणी चाललेल्या निदर्शनांची चित्रीत वार्ता पाहतांना असे वाटले की इंग्रजांच्या राज्यात जसे भारतीय पोलिसच इंग्रजाच्या आदेशानुसार भारतीयांवरच अश्रुधूर,लाठीमार,प्रसंगी गोळीबार करत असायचे हुबेहुब त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील पोलिस मराठी राज्यकर्त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत मराठी लोकांच्यावरच बेछूट लाठीमार करत सुटले होते! यालाच काय स्वराज्य म्हणायचे? समर्थकांना इतके भडकविल्यावर जाळपोळीचे चूकीचे पण उत्स्फ़ुर्त भावनापूर्ण प्रतिसाद उमटणारच!

कित्येक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानानंतर ६१ वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी आज आपलेच राज्यकर्ते राजकीय स्वार्थाकरता सर्वत्र जातधर्म वगैरेंच्या आधारावर आग लावत आहेत व आपल्याच पोलिस दलाचे खच्चीकरण करत आहेत!

महाराष्ट्रातला एकाहि राज्यकर्त्या माईच्या लालाची हिंमत नाही निधड्या छातीने रोखठोकपणे म्हणायची की महाराष्ट्रात जे नवे परप्रांतीय येत आहेत त्यांनी येथे कित्येक वर्षांपासून स्थायिक व समरस झालेल्या जुन्या परप्रांतीयांसारखे गुण्यागोविंदाने रहावे,येथे ९० टक्के प्राधान्य फ़क्त मराठी किंवा जुन्या महाराष्ट्रियन व्यक्तीनाच दिले जाइल व इतरांचे अर्ज सरसकट फ़ेटाळले जातील!

पण हे माईचे घाबरट लाल दिल्लीदरबारातील परप्रांतीयांना इतके घाबरतात की त्यांच्यात असा एक शब्द उच्चारायची हिंमत नाही.
महाराष्ट्राचा खरा अभिमान असता तर यातील एखाद्या तरी मंत्र्याने स्पष्ट शब्दात मराठी माणसांचीच बाजू घेतली असती व वेळप्रसंगी राजिनामासुद्धा दिला असता! पण सत्तेसाठी हपापलेले हे मिंधे काय असे करणार?

केंद्रिय गृहमंत्र्याचे कालचे लोकसभेमधील भाषण मराठी माणसाला लाज वाटेल असे होते! अशीच भाषणे ते प्रत्येक बांबस्फ़ोटात कित्येक व्यक्तींचा हकनाक मृत्यु झाल्यानंतर देतात!

आणि अतिशय अनुभवी पण कायमचे कोंग्रेस अध्यक्षांच्या दबावाखाली असलेले कृषीमंत्री महाराष्ट्रातील खरी परिस्थिती पूर्णपणे माहिती असूनहि दूरदृष्टीपणाने आपली खुर्ची आजन्म पक्की करण्याच्या इराद्याने मराठी माणसांच्या बाजूने एक शब्दहि न उच्चारता मौनव्रत बाळगणे पसंत करतात व आपल्या खासदार कन्यारत्नेला दूरचित्रवाणीच्या वार्तांहरांशी परप्रांतीयांचाच पुळका जाहिर करायला लावतात!

C.Y.Games च्या शेवटच्या दिवशीची शिसारी येणारी भाषणे ऐकून वाटले की हे मंत्री/नेते एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत तर होतेच,पण कोंग्रेस अध्यक्षांना दूरूनसुद्धा "मस्का" लावण्याची संधी सोडत नव्हते, जसे काय हा समाप्ती सोहळा म्हणजे चमच्या कोंग्रेस व NCP कार्यकर्त्यांचाच मेळावा होता!!! लाचारीच्या या कळसाची किळस आली!

काल ज्या तर्हेने वर्दीवाले तमाम पोलिस आपल्याच सर्व मराठी बांधवांच्यावर लाठ्या व जाळीच्या ढाली हातात धरून अमानुषपणे हल्ले करत होते ती दृष्ये पाहून आपण पुन्हा ब्रिटिशांच्या राजवटीतल्या महाराष्ट्रात गेलो आहोत असे वाटत होते!

काय भावना असतील या बिचा-या वर्दीवाल्या पोलिसांच्या? कोण हे आले राज्यकर्ते त्यांना असे करायला प्रवृत्त करणारे?
राजने एक शब्दहि उच्चारला तर त्यावर बंदी व अटकेची धमकी व या मुर्ख राज्यकर्त्या नेत्यांनी त्यांची थोबाडे उघडून कांहीहि बोलले तर त्याला कायद्याचे संरक्षण?
हा कुठला न्याय झाला? पोलिसांनीपण यापुढे असले मुर्ख हुकुम मानायचे कां याचा विचार करायला पाहिजे!

Anonymous said...

Abhinandan! Mumbai Polic And AABBSAHEB PATIL(R.R.Patil).
Aaba Tumhi Polisana Support Kelat,
Va Dakhavun Dilet Aapan Poladi purush aahat.Ithe Prashna Bihari,Hindu,Muslim asa nahi jar bandukichaya tokavar samanye mansal
vethis dharat Asel tar to konatyahi dharmacha nasato to phakt gunhegaar asato. Pan pratyak ghost matat tolanarya rajkarnyana kase samajnar! pan aabaa aapan great aahat!

aapla mi aabhari aahe aapan police depaermental support kelat!

Jay Hind Jay Maharashtra

Chandrashekhar Marathe said...

congratulations to Abba and the Maharashtra Police for correct action against Rahul Raj.

Abba what you did is right. Can anyone just come to Mumbai with Guns start killing and all these so called leaders from Bihar are supporting such an act.. This is crazy..

If you decide you can clean Mumbai of all the bad elements coming to the city from UP and Bihar and creating mess here. They are most welcome to contribute to the growth of the nation but not use Mumbai as battle ground. If you start cleaning Mumbai of such elements it will be a nice place to live.

Mumbai police you did the Right thing and to save one innocent even if you have to kill 1000 criminals that is OK ..

Chandra Marathe
Toronto Canada

Unknown said...

Saprem Namaskar/ Jay Maharashtra.
Me `Vishnu Balu Salvaged´ from Pandharpur, Maharashtra. Currently Working in Gothenburg (Sweden)
Dear Aaba
Thanks a lot for staying by the Police. In the rage of this politics, I am
really happy to know that there is somebody who understands the Police and
cares for them.
HOW A MAD PERSON CAN HOLD MUMBAIKAR WITH GUN-POINT. OUR HOME MINISTER Mr.R.R.PATIL HAD TOLD CORRECTLY...THAT "GOLI KA JAWAB GOLI SE....." POLICE HAD DONE A GREAT JOB. I WANT TO ASK NITISHKUMAR ,LALU YADAV & PASWAN IF SAME INCIDENT HAPPEN IN BIHAR, WHAT POLICE WILL DO??? MUMBAI POLICE ENCOUNTERED RAHULRAJ BECOZ TO SAVE OTHERS LIFE. MUMBAI POLICE DONT KNOW WHAT WEAPONS RAHULRAJ HAVING??? Maharashtra police is really doing well and being a Maharashtra I can
always say Maharashtra is the safest state to be in.
I like to say Mh-police & specially Aaba allover Maharashtra give a same treatment. But will not happen like KHAIRLANGI Rape Case. Take care @ same cases.
Please do keep up the good work.

Best Regards
Vishnu.

Unknown said...

this is too bad that lalu is blaming on Maharastra. What was happen is simple reaction taken by Police. The dead boy was bihari is bihari's problem not us so i think what police has done is 100% corect. No one has any right to coments on it.If the boy was from other state then lalu could say any thing.Lalu has to see the law and order condition in bihar and not in Maharastra."talya swatachya dolyatale musal disat nahi aani nighala Maharastrache Kusal kadhayala". I think lalu has no duety rather than speaking with media. So no need to give attation on lalu's speek. All Maharastra will be back of Aaba and Police.
Jai Maharastra.

Rubina Patil