Saturday, July 26, 2008

भाजपच्या पन्नास खासदारांना सत्ताधाऱ्यांनी आमिष दाखविले

भाजपच्या पन्नास खासदारांना सत्ताधाऱ्यांनी आमिष दाखविलेसकाळ न्यूज नेटवर्कनवी दिल्ली, ता. २५ - विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी सत्ताधारी गोटातून भाजपच्या पन्नास खासदारांना आमिष दाखविण्यात आल्याचा गौप्यस्फोट भाजपचे संसदेतील उपनेते विजयकुमार मल्होत्रा यांनी केला. यापैकी आठ जण "विकले' गेल्याने आमची मान शरमेने झुकली आहे; पण तीन सदस्यांनी त्यांना देऊ केलेले तीन कोटी रुपये नाकारले, याचे आम्हाला समाधान आहे, असे ते म्हणाले.

तीन खासदारांना दिल्या गेलेल्या कथित लाच प्रकरणाच्या चित्रफितीबाबत भाजप आक्रमक असून, येत्या ३६ तासांत संबंधित वाहिनीने ही चित्रफीत प्रसारित न केल्यास स्वतःच ती प्रसिद्ध करण्याची तयारी पक्षाने केली आहे. या प्रकरणाची चित्रफीत लोकसभा सभापतींच्या ताब्यात आहे. ती आपल्याला मिळावी, अशी मागणी पक्षाने केली असल्याचे मल्होत्रा यांनी पत्रकारांना सांगितले.

7 comments:

Anonymous said...

If BJP have ruling party can any one say they wouldn't have offered money ??? All politician are more or less same.

Anonymous said...

भारतीय जनता पार्टीचे सर्व वर्तन चूकीचे व अतिढोंगी,संधीसाधू,स्वार्थी व फ़क्त गांधी फ़मिलीला [व एका जमातीला] सदैव बांधलेले असूनहि स्वच्छ समजणारा कोंग्रेस पक्ष लांच देइल यात शंका कधीच नव्हती!
तरी त्यांचे पोवाडे गायणारे व BJP वर ताशेरे ओढणारे वरच्या anonymous सारखे आहेत याचाच कोंग्रेस पक्ष सतत फ़ायदा घेत असतो.
इतके स्फ़ोट झाले फ़क्त भा.ज.प.सत्तेत असलेल्या राज्यात हे काय दर्शविते?
हिंदूना जागे व्हा!!!

Anonymous said...

What's new in this? BJP and Advani can go to any extreme to get the power. They can kill the people, bring the shame to the country to get the power. When they were in power their ministers escorted militants and liked to get into the limelight even though it was very shameful incidence. Country was bowing to the terrorists. World watched it. Their ministers kids are involved in drugs and they can burn Rs 500 note to sniff the drug.

Anonymous said...

वरचे निनावी,
छान छान,तुमचा राग BJP वरच काढत रहा व आपल्या नाड्या mafia च्या हातात द्या!!!
परिस्थितीचे भान विसरा व जुन्या गोष्टी उकरून मनाचे समाधान करत रहा!!!
अर्थात तुमच्या विचाराने फ़रक पडेल कां नाही हे आगामी काळच ठरवेल!
तोपर्यंत चमच्यासारखी "री" ओढत बसा!!!
शुभेच्छा!

Shriniwas said...

sharmechi gosht aahe hi... jya deshat rashtrapati pan congress chya leader astana nyay milana mushkil aahe....

tari BJP ne media madhe jaun sarv praytna karava...

BJP is good party....Go for it.

Anonymous said...

इतक्या सलग स्फ़ोटांच्या जयपूर,बंगळूरु व काल अहमदाबाद येथिल मालिकांनंतरसुद्धा पांघरूण [कां बुरखा?] घातलेले केंद्र सरकार गप्प, कारण स्फ़ोट भारतीय जनता पक्षाची राज्ये असलेल्या राज्यातच झाले[कां घडवून आणले?].

दूरदर्शनवर आपल्या निष्क्रीय व घाबरट गृहमंत्र्यांची छोटी मुलाखत पाहिली त्यात ते स्वतःच इतके मानसिकदृष्ट्या दुर्बळ दिसले/बोलले!!!
तरीसुद्धा त्यांना अभय कारण ते कोंग्रेसअध्यक्षांची मर्जी संभाळून आहेत!!!

सध्याच्या केंद्र सरकारने जाणूनबुजून POTA व TADA सारखे Acts आपणहून repeal करून दहशतवाद्यांना एक प्रकारचे संरक्षण दिले व अल्पसंख्यकांची सहानुभुती व मते मिळविण्याचा मनसुबा रचला!

अर्थात असे स्फ़ोट होतात तेव्हा निरपराध लोकच[सर्व जातीजमातींचे] मरतात/जखमी होतात व त्याचे "Z" security च्या सुरक्षित कवचात वावरणा-या मंत्र्यांना सोयरसुतक नसते!!!

वरचे ५ निनावी उद्गार वाचून वाटते की हल्लीचे राजकारणी लोक पूर्वीसारखे राहिले नसले तरी जेव्हा एक ठराविक पक्षाचे सरकार आपले काम व्यवस्थित करू शकत नसेल तेव्हा पर्यायी सरकार निवडून त्याला राज्य करण्याची संधी देणे ही काळाची गरज असते.

"An eye for an eye & a tooth for a tooth" ही निती दहशतवाद्यांच्या बाबतीत राबविली नाही,अफ़झलला फ़ाशी देण्यात अक्षम्य दिरंगाई चालविली वगैरे वगैरे प्रकारांमुळे त्यांचे मनोधैर्य खूप वाढलेले आहे व त्याचा ते पुरेपूर फ़ायदा घेत आहेत!

कार्यक्षम व धडाडीचे एके काळचे उपपंतप्रधान व विरोधी पक्षनेते श्री.अडवानी यांच्यावर सतत शरसंधान करायचे व ब-याचशा वाईट/अनिष्ट गोष्टीना सर्वस्वी जबाबदार असलेल्या UPA च्या अध्यक्षांच्यावर मात्र स्तुतीसुमने उधळत रहायची या दुटप्पी वागण्यामुळेच या देशाचे अतोनात नुकसान होत चालले आहे!!!

भारतीय जनता पक्षच आता देश वाचवू शकतो असे कुठल्याहि पक्षाचा नसलेला एक सामान्य नागरिक म्हणून माझे स्पष्ट मत आहे!

meltyourfat said...

Dear Vaishali,
We are India blog aggregator and do have several language aggregators.
We just added a marati category as well. I will appreciate, if you can signup and submit your marathi blog at http://www.enewss.com

Thanks
sri