Friday, May 02, 2008

बीएनएचएस ः देशभरात 11 हजार गिधाडे

गिधाडेसंख्या घटत राहिल्यास भारतातील गिधाडे लवकरच नष्ट होण्याचा इशारा "बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) दिला आहे.

सरकारने उपाययोजना करूनही गिधाडे संपत चालली आहेत. दर वर्षी पन्नास टक्के या दराने गिधाडांच्या संख्येत घट होत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

""सध्या भारतात फक्त 11 हजार गिधाडे उरली आहेत. त्यांची संख्या लवकरच सहा हजारांवर येईल आणि अखेर हे पक्षी नष्ट होतील,'' असे "बीएनएचएस'चे संचालक अर्शद रहेमानी यांनी सांगितले.

आजारी जनावरांवर उपचारांसाठी वापरले जाणारे "डिक्‍लोफिनॅक' हे औषध गिधाडांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे. या औषधाच्या वापरावर सरकारने बंदी घातली आहे. या औषधाचा अंश असलेली मृत जनावरे खाल्ल्यामुळे गिधाडे मृत्युपंथाला लागल्याचे रहेमानी म्हणाले.

भारतीय उपखंडात गिधाडांच्या नऊ जाती सापडतात. त्यांतील "ओरिएंटल व्हाईट-रम्प्ड', "लॉंग बिल्ड' आणि "स्लेंडर बिल्ड' या तीन जातींची गिधाडांची संख्या 1990 पासून कमी होत चालली आहे. "बीएनएचएस'च्या पाहणीनुसार, 1992-2007 या काळात "ओरिएंटल व्हाईट-रम्प्ड' गिधाडांची संख्या 99.9 टक्‍क्‍यांनी, तर "लॉंग बिल्ड' आणि "स्लेंडर बिल्ड' गिधाडांची संख्या 96.8 टक्‍क्‍यांनी घटली आहे.

केवळ गिधाडेच काय, पण भारतातल्या वन्य जीव आणि पशुपक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी याची केवळ आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र, प्रत्यक्षात पाऊल काहीच उचलले जात नाही. त्यामुळे आकडेवारी जाहीर करण्याऐवजी धोरणनिश्‍चित करावी.

3 comments:

Anonymous said...

(1) Rivers are poluted with waste chemicals illegally released by industries along the rivers. This has made fishes extint, day by day.

(2) Forests are truned in concrete jungle, animals are extint day by day.

(3) The invisible cell phone waves frequency in air match the living honey bees natural frequency and the bees are getting extint day by day.

(4) Now we hear, pollution affecting the high altitude flying birds.Thus getting them extint day by day.

(5) Day is not far, the mankind will get extint day by day, as to him, the food is extint, food is unnatural, unburnt carbon-fuel in air, un-burnt bio-fuel in air (worse), and irreversable plastic waste.

"THINK GREEN, SAVE LIFE"

अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मानवरूपी राज्यकर्त्या गिधाडांनी व बोक्यांनी भारतातील सर्वच फ़स्त करण्याचा सपाटा लावल्यामुळे खरी पक्षीरूपी गिधाडेच नाहीत तर वने व त्यात रहाणारे वन्यप्राणी नष्ट होत चालले आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे!
सध्याचे केंद्र व राज्यसरकार याला सर्वस्वी जबाबदार आहे!
नुकतीच बातमी आली होती की मधमाशांचा व्यवसाय महाराष्ट्रात धोक्यात आला आहे कारण काय तर त्या वाढविण्याच्या पेट्या शासनाकडून वेळेवर मागविल्या जात नाहीत!
रोजच्या पेपरांत अकार्यक्षम पुढा-यांचा व मंत्र्यांचा उदोउदो व त्यांची थोबाडे दाखविणारे रस्त्यावरचे फ़्लेकबोर्ड/फ़लक पाहून चिड येते!