Thursday, January 24, 2008

खासगी कोचिंग क्‍लासबाबत धोरण ठरविण्याचे आदेश

खासगी कोचिंग क्‍लासवर नियंत्रण आणण्याबाबत राज्य सरकारने धोरण ठरवावे, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे; ते न ठरविल्यास आम्हाला आदेश द्यावे लागतील, असे न्यायमूर्ती बिलाल नाझकी व न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या भगवानदास रय्यानी यांच्या जनहित याचिकेवर या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. कोचिंग क्‍लासवर नियंत्रण आणण्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला होता; पण त्याचे कायद्यात रूपांतर झाले नाही आणि मुदत संपल्यावर तो संपुष्टात झाला. त्यानंतर क्‍लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काहीही केले नाही, असे अर्जदारांचे म्हणणे आहे.

शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षकांना क्‍लासेसमध्ये शिकविण्यास बंदी आहे. तरीही ते सर्रासपणे क्‍लासेसमध्ये शिकवत असतात, असेही अर्जदारांतर्फे सांगण्यात आले. त्यावर 33 शिक्षकांवर तक्रारी आल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली, अशी माहिती सरकारतर्फे न्यायालयास देण्यात आली.त्यामुळे कोचिंग क्‍लासबाबत सरकारने स्वतःहून धोरण ठरवावे; अन्यथा आम्हाला आदेश द्यावे लागतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्याबाबतची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र चार आठवड्यांत सादर करावे, असे खंडपीठाने नमूद केले आहे.

2 comments:

Anonymous said...

खासगी शिकवणी बाबत धोरण ठरवीने गरजेचेच आहे. आदेश योग्यच आहे. - आशीष बडवे ९४२२१६७२०५
www.dainikyavatmalnews.com
Email - ashish_badwe@yahoo.co.in

सुमित चव्हाण said...

सुमित चव्हाण.......................

राज्यामध्ये खासगी कोचिंग क्‍लासेसचे वाढते प्रमाण पहाता अशा प्रकारचे क्‍लासेस घेणे म्हणजे एक प्रकारचा व्यवसायच झाला आहे. बहुतेक शिक्षकांनी शाळेतील किंवा कॉलेजातील नोक्रया सोडून खासगी क्‍लासेस घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे त्यांचे आपल्या मुख्य कामावर दुर्लक्ष होत आहे. आज एखादा मुलगा किंवा मुलगी जेव्हा शाळेत जायला लागतात तेव्हा त्यांच्या पालकांना पहिली काळजी असते ती त्यांना कोणत्या खासगी क्‍लासमध्ये प्रवेश घ्यायचा याची. मग कुठल्या क्‍लासची फि कमी आहे, कोणाची फि कमी आहे याची शोधाशोध सुरु होते आणि त्यातून पालकांचे मनस्ताप वाढतात. खासगी कोचिंग क्‍लासेसच्या बाबतीत उच्च न्यायालयाने दिलेला आदेश एकप्रकारे योग्य पण आहे आणि एकप्रकारे चुकिचाही वाटतो. कारण आज कुटुंबातील जवळपास सर्व व्यक्‍ती कामानिमित्त बाहेर असतात व रात्री उशीरा घरी येतात. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडे वैयक्‍तिक लक्ष देता येत नाही. त्यामुळे असे पालक आपल्या मुलांसाठी खासगी क्‍लासेसची व्यवस्था करतात. आणि आपल्या कर्तव्यातून मुक्‍त होण्याचा केविलवाना प्रयत्न करतात. अशा मुलांना खासगी क्‍लासशिवाय पर्यायच रहात नाही. त्यामुळे असे क्‍लासेस घेणे म्हणजे एकप्रकारे योग्य वाटते. पण दुसरी गोष्ट अशी आहे कि खासगी क्‍लासेस घेणारे शिक्षक आपल्या क्‍लासेस घेण्याकडे जास्त वेळ देत असतात शिवाय क्‍लासेस लावण्याची सक्तिही करतात त्यामुळे त्यांचे शाळेतील लक्ष कमी होते. त्याचा परिणाम विद्यार्थ्याना भोगावा लागतो आणि नाईलाजाने त्यांना गरज नसताना त्यांना विनाकारण क्‍लास लावावा लागतो. अशा प्रकारामुळे हि गोष्ट चुकिची वाटते. म्हणून खासगी क्‍लासेस घेणे पुर्णपणे बंद करण्याऐवजी त्यांच्यावर काही प्रमाणात बंधने आणणे योग्य राहिल.


Contact information
Email : sum_chavan@yahoo.co.in