Thursday, January 17, 2008

पतंगाच्या मांजाने कापली "त्यांच्या' आयुष्याची दोरी...

उत्तरायणानिमित्त गुजरातमध्ये रंगणारी पतंगबाजी आता अनेकांच्या जिवावर बेतू लागली आहे. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांमध्ये या पतंगबाजीमुळे दहा जणांचे बळी गेले, तर दीडशेवर पक्षी प्राणाला मुकले आहेत. पतंगांच्या काटाकाटीसाठी वापरल्या जाणाऱ्या काची आणि चिनी मांजाने अनेक जिवांच्या आयुष्याची दोरी अकाली कापली आहे.

अहमदाबादसह बडोदा, सुरत, राजकोट आदी अनेक मोठ्या शहरांमधील पतंगबाजीने दोन हजारांवर पक्षी गंभीर जखमी झाले आहेत. कावळे, पोपट व घारांबरोबरच गिधाड, घुबड, निळे कबुतर अशा अलीकडे दुर्मिळ होत चाललेले पक्षीही पतंगांच्या मांजामुळे मोठ्या प्रमाणात दगावले अथवा घायाळ झाले आहेत. 562 पैकी गंभीर जखमी झालेल्या 90 पक्षांचे प्राण ते वाचू शकले नाहीत. बडोद्यात 100 जखमींपैकी 15, तर सुरतमधील 93 जखमींपैकी 25 पक्षी अखेर दगावले. अत्यंत धारदार मांजामुळे मान, पाय आणि पंख कापल्याने रक्ताळलेल्या; पण तरीही जगण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य पक्षांची अवस्था पाहणाऱ्यांना हेलावून टाकत होती.
जखमी झालेल्या पक्षांमध्ये दुर्मिळ अशा पांढऱ्या पाठीच्या, तसेच इजिप्ती गिधाडांचाही समावेश असल्याचे सलीम अली पक्षीविद्या आणि निसर्गशास्त्र केंद्राचे आर. जे. कुमार यांनी सांगितले. अनेक ठिकाणी झाडांवर पसरलेले मांजाचे जाळे पक्षांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत.

दुसरीकडे, राज्याच्या विविध भागांत मांजामुळे गंभीर जखमी झाल्याने, तसेच पतंग उडविताना उंचावरून पडल्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या दहा झाली आहे. बिपिन पटेल काल दुचाकीवरून जात असताना अचानक आडव्या आलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. शहरालगतच्या जेटालपूरमधील स्वामिनारायण मंदिर परिसरात पतंग उडविताना छतावरून पडलेल्या संदीपसिंह महिदा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पाश्‍चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात भारतीय संस्कृती परंपरा जोपासणेकडे दुर्लक्ष होत आहे, अशी ओरड वारंवार केली जाते. शिवाय संस्कृतीचे जतन करणे चुकीचेही नाही. मात्र ते करत असताना काही गोष्टींचे किमान भान बाळगले गेलेच पाहिजे. अन्यथा हा अतिरेकच संस्कृतीवर गदा आणण्यास कारणीभूत ठरू शकतो, नाही का...?

4 comments:

Anonymous said...

This is so annoying & rediculous that people & birds are dieing coz of Patangbaji....
People should have a little commansense & what our goverment &/ enviornmental sansthas doing to stop such pathetic activites?

Anonymous said...

Its really not good that birds are getting killed. But Mr Anonymous above, dont start usual blaiming govt for this one too!! Do you want to suggest that pantangbaazi is useless and its a pathetic activity? I DONT think so. Dont just blaim systems and cry on that. at least suggest something!! In my openion, people should use some cloth around neck while driving on 2-wheelers and so on. But unfortunately, birds cannot do this and are going to suffer. But its only for a few days!! But I can understand its really painful for helpless birds!

HAREKRISHNAJI said...

पतंगबाजी अजुन किती बळी घेणार ? आणि या बद्द्ल कोणाला जबाबदार ठरवणार ? धारधार मांज्यामुळे किती पक्षी जायबंदी होतात, मरतात याची आपल्याला फिकीरच नसते पण निदान मानवी जीवाचे तरी मुल्य आपण जाणायला हवे, ठेवायला हवे.
रस्तावरुन दुचाकीवरुन जाणारे , ज्यांचा या खेळाशी संबध ही नाही ते धारधार मांज्याने गळा चिरुन मरण पावतात, गच्ची वरुन पतंगबाजाच्या नादात वरुन खाल पडुन मुले, माणसे मरतात, जायबंद होतात, रस्तावर पतंग पकडण्याच्या नादान बेहोशीने धावल्या मुळे मुलांना अपघात होतात.
आपले सणात हे असेच,या प्रकारचे उपद्रावमुल्य असायला हवेच का ?
गोविदा, उंच दहीहंडी फोडतांना थर कोसळुन जखमी होणे, दिपावलीत फटाक्यांमुळे मुले भाजणे, ( माझ्या माहीतीत एका मुलाला आपला डोळा अनारामुळे गमवावा लागला ), फटाक्याचे ध्वनी,वायु प्रदुषण, होळीत पाण्यानी भरलेले फुगे मारल्या मुळे डोळ्यावर गदा येणे, गुलाल व ईतर कॄत्रीम रंगांमुळे ईजा होणे . गणेशोत्सावातील, नवरात्रीमधी ध्वनीप्रदुषण, त्या लाउडस्पिकरच्या भिंती, रस्ते अडवुन बांधलेले मंडप .
कोठेतरी आपण यातुन मार्ग काढायला हवा .

Anonymous said...

I think, in India people are just looking for reasons to Die.