Sunday, January 13, 2008

"भारतरत्न'वरून राजकारण रंगले

यंदाचा "भारतरत्न' किताब देण्यावरून आता राजधानीत राजकारण रंगू पाहत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना हा किताब देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी यांनी केल्यानंतर, या सन्मानासाठी कांशीराम यांचे नाव बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज पुढे केले.

ज्योती बसू आणि अभिनेते दिलीपकुमार यांच्या नावासाठी कॉंग्रेसने आधीच सहमती दाखविली आहे.दलितांच्या उद्धारासाठी आणि कनिष्ठ जातींतील भिंती पाडण्यासाठी कांशीराम यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना "भारतरत्न' किताब द्यावा, अशी मागणी मायावती यांनी आज पंतप्रधानांकडे फॅक्‍स पाठवून केली. दरम्यान, "कोणताही सरकारी पुरस्कार घेण्याची पक्षाची पद्धत नाही,' असे सांगून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने ज्योती बसू यांचे नाव या वादातून बाद केले. वाजपेयी यांच्या नावाच्या मागणीनंतर बसू यांचेही नाव पुढे आले होते आणि कॉंग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही त्याला सहमती दर्शविली होती. "याआधी नरसिंहराव सरकारच्या काळात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ईएमएस नंबुद्रीपाद यांना "पद्मविभूषण' सन्मान देण्याचा सरकारचा प्रस्तावही पक्षाने फेटाळला होता,' असे एका नेत्याने सांगितले. वाजपेयी, बसू, कांशीराम यांच्याबरोबरच द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांचेही नाव पुढे आले आहे.

भारतरत्न या किताबावरून दिल्लीत नेत्यांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच ही निंदणीय आहे. तुम्हालाही असे वाटते का?? षवरेज्ञ कोणाला हा किताब मिळवा, असे तुम्हाला वाटते?

6 comments:

Anonymous said...

I feel that Baba Amte should get Bharat Ratna

Anonymous said...

namaste i am sampat sawant from iraq. i thinking about Atalbihariji Vajpaee. because Atalji now stopped politics and when thay priministar thay did good work. NH-4 way don`t forgate that.

Anonymous said...

It is utter stupidity to let these selfish poloticians make a choice for such well-deserved award. Shouldn't there be a un-biased body of intellectuals taking such decisions??

Anonymous said...

१] Every suggestion/past decision on this most prestigious & important award has mostly been taken by the ruling politicians at the centre.
There was nothing wrong in Shri.Advani suggesting Shri.Vajpayee's name for Bharat Ratna as he has done yeoman's service to the parliament & the country over several decades.But the congress coterie has neither the magnanimity nor the guts to agree to this suggestion & deems that only scions of the Nehru Gandhi clan or much lesser mortals will be the deserving candidates.
2] Now of course,in the present permissive Raj,many politicians of all hues are making few ridiculous suggestions too,oblivious to the fact that the janata is watching the tamasha unfolding on the nation's canvas.
3] वर एका व्यक्तीने सुचवल्याप्रमाणे हे सिलेक्शन करण्याचा अधिकार अराजकीय प्रसिद्ध व्यक्तींनाच द्यावा व "भा्रतरत्ना" साठी श्री.वाजपयी,श्री.बाबा आमटे तसेच श्री.नारायण मुर्ती व रतन टाटांसारख्या व्यक्तीमत्वांचापण विचार करावा!
पण हे सध्याच्या राजवटीत होण्याची शक्यता फ़ारच कमी आहे!
4] गेले एकदोन दिवस वर्तमानपत्रात टोटोलिंगवर लढाईत धारातिर्थी पडलेल्या स्थलसेनेच्या
अधिका-यांच्या आप्तेष्टांना जनरल कपूर यांच्या हस्ते सेनामेडल वगैरे देतानाचे फ़ोटो आले आहेत!वास्तविक पूर्वी अशी पदके व प्रशस्तीपत्रे प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती भवनात देण्यात यायची!
5] पण जे सरकार संसदहल्ल्यात मरण पावलेल्या जवानांना दिलेली पदके देशद्रोही अफ़झलच्या फ़ाशीशिक्षेत होणा-या दिरंगाईला कंटाळून त्यांच्या विधवा/नातेवाईकांकडून परत केल्यावर परत घेते ते भारत देशाच्या सरहदीवर तैनात असलेल्या हजारो सैनिकांच्या भावनांशी सतत खेळतच आहे व ते काय देणार शौर्याची आणखी मरणोत्तर पदके २६ जानेवारीला?
६] गृहमंत्री दहशतवाद्यांनी धमक्या दिल्यावर सुरक्षाव्यवस्था कडक करणार किंवा स्फ़ोट व हानी झाल्यावर आग तात्पुरती विझवणार!
७] संरक्षणमंत्रीच पत्रकारांनी विचारल्यावर मान्य करतात की चीनकडून अरुणाचलमध्ये घुसखोरी कित्येक महिने चालू आहे व त्याची योग्य समिती दखल घेत आहे व अशा छोट्यामोठ्या घटना चालूच असतात!
श्रीमती इंदिरा गांधी १९७१ च्या युद्धात खंबीर राहिल्या होत्या!
तसेच श्री.वाजपयी १०० दिवस चाललेल्या कार्गिल युद्धाच्या विजयी शेवटापर्यंत कुठल्याहि आंतरराष्ट्रीय वा अंतर्गत दबावाला झुकले नव्हते!
८] पण आजच्या अतिशय कमकुवत कोंग्रेस पक्षाला व सरकारला सत्ता कशीहि टिकवण्यासाठी देशाचे वाटोळे झालेले चालते! गुजरातमध्ये निवडणुकांआधी खर्चायच्या/वाटायच्या कोंग्रेस पक्षाच्या ४५० कोटी रुपयांपैकी बहुतांश पैसे तेथे न पोचताच कुठे गायब झाले असा प्रश्न एकाच कोंग्रेस पुढा-याने श्रीमती सोनियांना विचारल्यावर त्यांचा चेहरा पडला व त्यांच्या स्वीय सहायकानेपण पोबारा केला ही बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती! पण तेरीभी चूप,मेरीभी चूप!
वारेवा,काय दिवस आले आहेत!फ़क्त शेअर बाजाराकडे बघा व दैनंदिनी लागणा-या वस्तु घेण्यासाठी कर्जे घेवून कायमचे कर्जबाजारी व्हा!

Anonymous said...

काश्‍मिरी स्थलांतरितांपासून पुणे शहराला धोका नाही; मंत्र्यांचा निर्वाळा
If Kashmir residence can stay in Pune and enjoy there freedom and social life then can Punekar do the same in Kashmir? Does he/she have rights?

सुमित चव्हाण said...

देशातील 'भारतरत्न'या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी चाललेली चढाओढ पाहून खुप वाइट वाटले. भारतीय राजकारणामध्ये कधी काय होइल हे सा ंगणे फार कठीण आहे. सत्तेसाठी तर इथे कायमच राजकारण केले जाते. पण भारतासारख्या मोठा इतिहास असलेल्या देशामध्ये 'भारतरत्न' सारख्या अतिशय महत्वाच्या आणि सर्वोच्च असा पुरस्कार आपल्या पक्षातील कोणा व्यक्‍तीला देण्यात येण्यासाठी चाललेले राजकारण म्हणजे देशाच्या अस्मितेला धक्‍का पोहचवणारी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. अशी मागणी करताना ह्या लोकांनी भारतरत्नाविषयीचा इथून मागील इतिहास तपासून पहायला हवा होता. यातून असे स्पष्ट होते कि कुठल्याही पक्षाने उठावे आणि आपल्या नेत्याचे नाव भारतरत्नासाठी पुढे करावे.पण त्या व्यक्तीची क्षमता आहे कि नाही हे ही तपासून पाहणे गरजेचे आहे.भारतामध्ये अनेक थोर लोक होउन गेलेले आहेत कि जे भारतरत्नासाठी योग्य आहेत.पण सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी कधीही या गोष्टीचा विचार केला नाही.हे करण्याएवजी त्यांनी नको त्यांचीच नावे पुढे केली आणि त्यातून वाद निर्माण झाले आहेत. मधल्या काळामध्ये कोणालाही हा पुरस्कार देण्यात आलेला नाही.तेव्हा याची कोणीही चर्चा केली नाही. आणि आता जेव्हा निवडणुका जवळ येवू लागल्या वरच या ंना पुरस्काराची आठवण का झाली. आताच का यांचे देशप्रेम जागे झाले आहे. यातून राजकिय पक्षांची स्वार्थाची भावना दिसून येते. देशातील नागरिकांकडे योग्य त्या व्यक्तिची निवड करण्याची जबाबदारी दिली गेली पाहिजे जेणेकरुन यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण येणार नाही आ णि योग्य त्या व्यक्तीचीच जनता या सन्मानासाठी निवड करेल याची मला खात्री वाटते.


सुमित चव्हाण