Tuesday, May 01, 2007

Two Worlds


देशात सर्वाधिक गुंतवणूक होणारे राज्य असा लौकिक मिरविणाऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील वास्तव मात्र याच्याशी पूर्णपणे विसंगत आहे. राज्यातील कृषी संस्कृती वेगाने लयाला जात असून, सुमारे पाच हजार गावे दारिद्य्राच्या विळख्यात सापडली आहेत आणि तितकीच त्या मार्गाने जात आहेत! ......
आज या राज्यात सुमारे एक कोटी नागरिक दररोज भुकेल्या पोटी जगतात आणि ही भूक काही प्रमाणात मिटावी यासाठी सुमारे ५० लाख लोक हंगामी स्थलांतर करतात... राज्यातील सहकारी संस्था आजारी असून शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता या आघाड्यांवरही भीती वाटावी अशी स्थिती आहे...

ही सर्व निरीक्षणे नोंदविली आहेत "दुष्काळ हटवू, मनुष्य जगवू' या घोषणेसाठी साठ दिवसांमध्ये ९४४ किलोमीटरचे अंतर चालून पूर्ण केलेल्या पदयात्रींनी. मराठवाडा आणि विदर्भाच्या सुमारे १६५ गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन तयार केलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्राचे हे भीषण वास्तव समोर आले आहे.

4 comments:

Jitendra said...

Yes, indeed Maharashtra is the highest investing state in India, but the investments are being made to improve the urban lifestyle. The major investments are happening in cities like mumbai, Nagpur and Pune.
If you see the agriculture sector in Maharashtra, there is always issues related to pricing of agricultural products like cotton, sugarcane or vegetables. The farmers hardly gets any benefits form the crop yield and their market price. Due to this, these people will not be self reliant to develop themself and their society.
The second factor is the illeteracy and corruption. The most of the co-op sectors are corrupted and mentored by political leaders. This keeps the poor peoples away form the subsidies which is their right.
The compition of the private sectors is always welcome against these co-op sectors. The worth example is the telecom sectors.

Suresh3211 said...

'पदयात्रीचे' आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

माधव बामणे said...

महाराष्ट्र राज्याचा प्रगतीचा आराखडा सुखावणारा असला तरी तो सर्वदूर पोहचला नाही. याचे मुख्य कारण अदूरदृष्टी. एका आमदार झालेल्या प्राध्यपकांच्या डोळ्यात माहिती क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगार संधी पाहून त्यांच्या डोक्यात इंग्रजीचे भूत संचारले. फर्मान काढले 'पहिली पासून इंग्रजी' जसे कांही सर्वाना इंग्रजीत प्रवीण केले की सर्व माहिती क्षेत्रात प्रवीण होऊन लठ्ठ पगाराच्या नोक-या मिळ्वणाच. अगदी शेतातील मजूर सुद्धा लाखोनी पैसे कमावणार!

साधी गोष्ट महाराष्ट्रातील लोकामध्ये सुद्धा इतर राज्याप्रमाणे थोडे बुद्धीवान व बाकी सर्वसाधारण बुद्धीमत्तेचे आहेत. तेंव्हा याचा फायदा ५-१० % लोकानाच होणार. बाकी शिकले तर इतर कामे करण्यास राजी होणार नाहीत अथवा प्रत्येक इयत्तेत २- वर्षे मुक्काम ठोकतील. प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे शिक्षणाच्या संधी निर्माण करण्याचे त्याना सुचले नाही. एखादा शेती करु इच्छितो तर त्याच्याकरता शेती प्रशिक्षण संस्था का नाही. जर कोणी म्हणत असेल की, मला शेतक-यांचे प्रश्न व उत्तरे माहित आहेत तर ते शासनात असताना शेतकरी आत्महत्या का करतात? ते कर्जबाजारी शेतक-यांच्या जमीनी खंडाने करुन त्यांचे पोटपाणी भरुन, त्यना शेतीचे धडे देऊन कर्जफेड का करत नाहीत? याला कारण स्वार्थ. लोकाना भुलऊन स्वत:चा फायदा क्रुन घेण्याची वृत्ती.

शासनाला या रिपोर्टवरुन तरी जाग यावी. व्यवसाय अभीमुक शिक्षण देण्याची, दुष्काळी क्षेत्रात द्रुगतीमार्ग बनवण्याची, दुष्काळी भागात विशेष आर्थिकक्षेत्रे स्थापन करण्याची, औद्योगिकरण खेड्यात नेण्याची, शहरांचा विस्तार रोखण्याची बुद्धी होऒ.

मधव बामणे said...

मी खालिल वेबवर लेख पाहिला. मला आवडला तुम्हालाही आवडेल.

http://geocities.com/janahitwadi/maharashtrachipragati.htm