Thursday, February 22, 2007

Should There Be A Separate Budget For Agriculture?

Read this news from Agrowon.com

नियोजनप्रकियेत दुर्लक्ष झाल्यानेच शेतकरी संकटात;
शेतीसाठी हवा स्वतंत्र अर्थसंकल्प

ही आकडेवारी विचारात घेता 10.3 टक्के कुटुंबांकडे जमीन नाही, तर 48.7 टक्के कुटुंबांकडे केवळ एक एकरपर्यंतच जमीन आहे, म्हणजेच 59 टक्के कुटुंबांकडे जमीन नाही अथवा आहे, ती जमीन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी नाही. याचाच अर्थ 59 टक्के ग्रामीण कुटुंबे शेतमजूर म्हणून काम करतात, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. यापुढे जाऊन 1 ते 2.5 एकरपर्यंत क्षेत्र धारण करणारी कुटुंबे 18.8 टक्के आहेत. म्हणजेच सर्वसाधारणपणे 19 टक्के कुटुंबे जेमतेम उदरनिर्वाह करीत आहेत, म्हणजेच ग्रामीण जनतेपैकी 78.80 टक्के लोकसंख्येस शेतीव्यतिरिक्त अन्य जोडधंद्याची किंवा अन्य उदरनिर्वाहाच्या साधनाची जरुरी असल्याचे स्पष्ट दिसते. या टक्केवारीवरूनच ग्रामीण जनतेसाठी स्वतंत्र केंद्रीय अर्थसंकल्प आवश्‍यक असल्याचे स्पष्टीकरण देण्यास कोणा अर्थतज्ज्ञांची आवश्‍यकता नाही
.
-------------------------------------------
COMMENTS
माधव बामणे
स्वतंत्र अर्थसंअक्ल्प हा पर्याय चांगला आहे. त्या मध्ये शेतकऱ्याच्या शिक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. शेतिचे आधुनिक तंत्रञान, आर्थिक नियोजन, बाजारभाव या मध्ये शेतकरी निपुण असला पाहिजे. शेतकऱ्यामध्ये शेतमाल साठवून ठेवण्याची क्षमता असली पाहिजे. हे व अशा गोष्टींची पुर्तता होणार असेल तर वेगळा अर्थसंकल्प अवश्य असावा.
--

No comments: