Showing posts with label valentine day. Show all posts
Showing posts with label valentine day. Show all posts

Thursday, February 14, 2008

प्रेम व्यक्त करा; पण मर्यादा राखून!

"व्हॅलेंटाईन डे'. पहिल्यापासूनच कायम वादाचा आणि तरुणाईसाठीही मात्र तितकाच महत्त्वाचा दिवस. तो साजरा करावा किंवा नाही यावर वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते प्रेम ही सार्वत्रिक भावना आहे. ते व्यक्त करण्यासाठी एखादा दिवसच असावा, असे बंधनकारक नाही. शिवाय भारतीय संस्कृतीने सर्व जगाला प्रेमाची शिकवण दिलेली असल्याने पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण कशासाठी करायचे? आपल्या संतांचे विचार आचरणात आणले तर "व्हॅलेंटाईन'ची गरजच भासणार नाही. काहींच्या मते, जगभरात हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यात काहीही गैर नाही. त्यामुळे आपल्या संस्कृतीवर आक्रमण होते, असे म्हणणे म्हणजे संकुचितपणाचे ठरेल.

आपलीही अशीच मते आहेत का? की तुम्हाला यापेक्षाही वेगळे वाटते. तुमचा "व्हॅलेंटाईन डे' ला विरोध आहे, की आपल्याला तो सेलिब्रेट करायला आवडतो? मग आम्हाला नक्की लिहा...