Showing posts with label metro rail. Show all posts
Showing posts with label metro rail. Show all posts

Tuesday, August 26, 2008

पुण्यात रिंग रोड, "मेट्रो'ला मान्यता

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीबाहेरून जाणारा १६० किलोमीटर लांबीचा "रिंग रोड' खासगीकरणाच्या माध्यमातून उभा करण्याचा आणि मेट्रो रेल्वेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला यासाठी सुमारे दोन हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पायाभूत समितीपुढे येत्या पंधरा दिवसांत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास विभागीय आयुक्तांना सांगण्यात आले. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले.

मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल का? तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला कळवा.