Showing posts with label childs. Show all posts
Showing posts with label childs. Show all posts

Sunday, October 26, 2008

सामाजिक जाणिवांची दिवाळी

दिवाळी हा प्रकाशाचा सण. त्याचा आनंद उपेक्षितांपर्यंत पोचावा, यासाठी स्वतः अंधारात राहून काम करणारे अनेक असतात. याचा अनुभव मंडईजवळच्या एकलव्य संस्थेतील मुलामुलींनी नुकताच घेतला. रेणुताई गावसकरांच्या संस्थेतील या मुलांना काही अनाम कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर नेले. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या जशा सजल्या, तसेच प्रेमाने त्यांना कुल्फी, आइस्क्रीम खाऊ घालणारेही भेटले. स्वतःच्या पसंतीने नवे कपडे खरेदी करण्याचा; किल्ला, मातीची खेळणी, आकाशकंदील खरेदी करण्याचा आनंदही या मुलांनी लुटला. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता दिवाळीचा प्रकाश. मिलिंद वाडेकर यांनी हा प्रकाश कॅमेऱयात टिपला आहे...


अशी सामाजिक जाणिवांची दिवाळी आपणही साजरी करत असाल. आपणही कधी असे क्षण अनुभवले असतील. नाहीतर..., असं काही करायची, या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छाही असेल? काय वाटतं तुम्हाला हे वाचून? मग आमच्याशी शेअर करायला विसरू नका...छायाचित्रे पुणे प्रतिबिंब ब्लॉगवर पाहायला मिळतील.