सुरतमध्ये वीस जिवंत बॉम्ब
गुजरातमधील सुरत शहरात आज सकाळपासून वीस ठिकाणी जिवंत बॉम्ब सापडले. बॉम्बनाशक पथकाने हे सर्व बॉम्ब निकामी केले आहेत. शहरातील रस्ते, बाजार, दुकाने, उड्डाणपूल, होर्डिंग्ज याबरोबरच अगदी झाडांवर आणि दोन पोलिस ठाण्यांजवळही बॉम्ब सापडले. वाराछा रोड परिसरात सर्वांत जास्त बॉम्ब सापडले. बॉम्ब असल्याची शंका अनेक ठिकाणच्या जागरूक नागरिकांनीच पोलिसांकडे व्यक्त केली आणि तो बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. साधारणपणे दर अर्धा तासाने एका ठिकाणी बॉम्ब सापडत असल्याने बॉम्बनाशक पथकाला दिवसभर धावपळ करावी लागली.
गेल्या शनिवारी (ता. २६) अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर गुजरातचे व्यापारी केंद्र असलेल्या सुरत शहराला लक्ष्य करण्यात आले.
सुरतला बॉम्बस्फोटाचे लक्ष्य करण्यात कोणाचा हात असून शकतो? दहशतवादी संघटना की सत्तेचे राजकारण? अशावेळी शासनाने कोणती भूमिका घेणे आवश्यक आहे.