क्रेडिट कार्डधारकांना सहा हजार कोटींचा गंडा!
 |
|
चेन्नई, ता. ३ - गेल्या दहा वर्षांत भारतातील क्रेडिट कार्डधारकांना "अतिरिक्त शुल्का'च्या नावाखाली सहा हजार कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे, अशी माहिती क्रेडिट कार्डधारकांच्या संघटनेने दिली आहे. ........
त्यामुळे ही उकळलेली जादा रक्कम बॅंका आणि वित्त संस्थांकडून ग्राहकांना परत मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे संघटनेने ठरविले आहे.
क्रेडिट कार्ड ही आता काही चैनीची, प्रतिष्ठेची बाब राहिलेली नाही. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत क्रेडिट कार्डधारकांची संख्या अक्षरश- झपाट्याने फोफावली आहे. नेमकी हीच बाब हेरून बॅंका आणि वित्तसंस्थांनी क्रेडिट कार्डधारकांना अक्षरश- गंडा घातला आहे. भारतातील व्याजदर जगात सर्वांत जास्त तर आहेतच; पण त्याचबरोबर "अतिरिक्त शुल्का'चा सुळसुळाटही मोठा आहे. ""लेट फी, ओव्हरलिमिट फी, चेक पिकऍप फी, कॅश ऍडव्हान्स फी, बिल्ड फायन्सास फी यांसारख्या नावांखाली बॅंकांकडून ग्राहकांना अक्षरक्ष- लुबाडले जाते. गेल्या दहा वर्षांत या पद्धतीने सहा हजार कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे,'' असे संघटनेचे सरचिटणीस सी. व्ही. गिडप्पा यांनी सांगितले.
आकडे बोलतात...
- क्रेडिट कार्डची संख्या - २.२ कोटी
- क्रेडिट कार्डवरून झालेल्या व्यवहारांची संख्या - १५.५७ कोटी
- क्रेडिट कार्डवरून झालेली खरेदी - ३३,५०० कोटी
- प्रति कार्ड मासिक खरेदी - १६७९ रुपये
(एप्रिल ०६ ते जानेवारी ०७)
3 comments:
......."""भारतातील व्याजदर जगात सर्वांत जास्त तर आहेतच; पण त्याचबरोबर "अतिरिक्त शुल्का'चा सुळसुळाटही मोठा आहे. ""लेट फी, ओव्हरलिमिट फी, चेक पिकऍप फी, कॅश ऍडव्हान्स फी, बिल्ड फायन्सास फी यांसारख्या नावांखाली बॅंकांकडून ग्राहकांना अक्षरक्ष- लुबाडले जाते........""""
भारतात क़ेडिट काडँ ' मास्टर काडँ' ने सुरूवात झाली. त्याला वीस वषाँहून अधिक काळ लोटला. मी तेव्हापासून ही ' लूट' अनुभवत आहे.
लुट ही होतच रहीणार कारण जे फँर्म सही साठि दीले जातात.ते कोण निट वचत नाही आणी एखाद्यने वाचायचा प्रयत्न केला तर ते मातृभाषेत नसल्यने आपण आज्ञनी आहे आसे समोरील व्यक्ती समजेल त्या मुळे सहीक करतात.तसेच कंपनि सर्व माहीती देत नाही
दुनिया झुकती है झुकाने वाला चहीए
Wow! what a nice bog, it's really amazing, if you want to know about Credit Cards for Bad Credit then check it.
Post a Comment