What MahaDisCom Is Doing?
वीजग्राहकांना जबर फटका;३५ टक्के दरवाढीची "महावितरण'ची मागणी
मुंबई, ता. १७ - राज्यात विक्रमी भारनियमन होत असताना वीजदरात सरसकट ३५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची मागणी करणारा प्रस्ताव महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगापुढे सादर केला आहे. ....
.... ही दरवाढ मान्य झाली, तर राज्यातील वीजग्राहकांना जबर फटका बसणार आहे. आगामी तीन वर्षांसाठी वीजदर प्रस्ताव सादर करण्यात आला असून दरवर्षी वीजदरात वाढ मागण्यात आली आहे.
2 comments:
What MahaDisCom is doing?महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे प्रचंड प्रमाणांत होणा-या वीजचोरीमुळे, transmission losses मुळे व अपु-या वीजपुरवठ्यामुळे होणारे नुकसान कमी करणाच्या उद्देशाने MSEBचे विभाजन करण्यात आले होते.परंतु वस्तुस्थिती पाह्तां महावितरण (MSED)कंपनी यांत यशस्वी झालेली नाही.
चालूच असलेल्या नुकसानाची अपू-या व महागड्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या प्रामाणीक वीजग्राहकांवरच पुढची ३ वर्षे प्रचंड दरवाढ लादून भरपाई करण्याचा हा प्रस्ताव वीज नियामक आयोगाने अमान्य करावा अशी आशा करुया कां आपण?
'प्रयास'ही ग्राहक संरक्षणासाठी दक्ष संस्था यात वेळेत हस्तक्षेप करेल अशी आशा करतो!
मोठ्या वीज चोरांच्यावर नुसते नोटिसा देउन फ़ार फ़रक पडलेला नाही.त्यांचा वीजपुरवठा कायमचा खंडित करुन त्यांच्यावर शीघ्रगती कोर्टांत खटले चालवले,त्यांची मालमत्ता जप्त करून थकित वीजबाकीची वसूली केली व त्यांच्या मुसक्या बांधल्या तरच या देशविरोधी प्रकाराला आळा बसेल!प्रामाणीक वीजग्राहकांनाच कां नेहेमी वेठीस धरले जाते?त्यातच टाटांसारख्या कार्यक्षम private कंपन्यांना काही अपवाद वगळता फ़ारसा वाव दिला जात नाही ही खेदाची गोष्ट आहे!
सुभाष भाटे
ha anyay ahe. hyavirudh koni avaj kasa uthavat nahi??
Post a Comment