Tuesday, May 22, 2007

देशाच्या महसुलासाठी मुक्त मद्यविक्री आवश्‍यक - विजय मल्या


मद्यपान आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले जात असले, तरी मद्यविक्रीमुळे सरकारच्या महसुलात मात्र भर पडते. सद्यस्थितीत देशाला २५ हजार कोटीचा महसूल मद्यविक्रीच्या करांतून मिळतो. त्यामुळे मद्यविक्रीवर निर्बंध लादणे योग्य ठरणार नाही, असे मत मद्यसम्राट विजय मल्या यांनी व्यक्त केले. ...... महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या "वाईन' धोरणाचेही त्यांनी समर्थन केले. महाराष्ट्र सरकार नेहमीच अधिक महसूल मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असते. वाईन उद्योगामुळे महाराष्ट्राला मोठा महसूल मिळणार आहे. शिवाय त्याचा कृषी क्षेत्रालाही फायदा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे वाईन धोरण योग्यच असल्याचे ते म्हणाले. जगातल्या सर्वच देशांमध्ये मुक्त मद्यविक्री केली जाते. भारतानेही मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. त्याअनुषंगाने आपल्याकडेही असे बदल करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

12 comments:

Aditya Narayan Joshi said...

Are vijay mallaya taar asach mhananr na ?
government la dusre raste kay kami ahet kaay paisa khayla ?
ani kharokharach changlya kamansathi upyog honar asel tar sagle nagrik jast tax dyayla ready ahet mhanav sarkarla.
don't allow wine,daru,beer or any other type of it to be sold in INDIA.
Government changle kayde karun te implement karnyasathi asta...he asle WINE dhorn vagaire banvun chukichya goshti OFFICIAL banavnyasathi nahi.
arthat aikto kon mhana ?
Aapan aple blog liha..
ani aapla man mokla kara bass...

Unknown said...

१)परदेशांचे आंधळे अनुकरण करताना देशातच तयार झालेल्या दारूला विदेशी मद्य म्हणवून खूप जाहिराती करून खूप खप वाढवायचा व देशाच्या अमर्याद वाढणा-या लोकसंख्येबरोबरच बेवड्यांचीपण लोकसंख्या वाढवायची व दारूच्या किंमती सतत वाढवित रहायची ही तर या मद्यार्क बनविणा-यांची नितीच आहे.पण मग या वाहत्या गंगेत "हात" धुवून घ्यायला आपले आम जनतेचे सरकार सरसावले नाही तरच नवल?महसूल वाढविण्याकरता दर वर्षी मद्यावरचे कर वाढविणे चालूच आहे.
२) या दारू उत्पादकांना व सरकारला 'economies of scale' चा फ़ंडा माहित असता तर त्यानी मद्याचे दर व महसूलाचे दर कमी केले असते व आम जनतेला आणखी काही "घोट/आचमने" घेणे सोपे केले असते.पण फ़ुकटचा हा महसूल कोण सोडणार तोसुद्धा आपल्या एका खासदाराने सुचविल्यावर?
३) आपल्या माननीय कृषीमंत्र्यानी द्राक्षांच्या पिकाला आणखी सुगीचे दिवस यावेत म्हणुन जनतेने "वाईन" प्यावी असे सुचविले आहेच कारण आपल्याला पास्चात्यांचे अनुकरण करण्याची फ़ार घाई झालेली आहेच.
४) एका मोठ्या प्रसिद्ध दारू उत्पादक व विक्रेत्याकडून तोसुद्धा "खास"दार असल्यामुळे दूसरी कुठली अपेक्षा करणार?
५)दारूविक्री सर्व महामार्गांवर सर्रास चालू असल्याचे दुष्परिणाम आपण देशातल्या अपघातांचे वाढते प्रमाणच दाखवित आहे!
६)Those clever people "fishing in the Indian troubled waters" have become "KINGS" & their famous "KINGFISHER" brand is visible not just on the beer bottles,but also on some very modern aircraft flying the Indian skies.
A 650 ml beer's manufacturing cost is not over Rs.10/ or 12/,the bottle purchased in bulk(mostly recycled like abroad!)costs not more than a Rs.2/,lable etc another rs.2/ & how much does it sell for in say Maharashtra?Around Rs.63/Why why why?????Because there is a terrific profit margin for the manufacturer & then on it are the taxes,excise etc to swell the govt coffers!But he has to diversify his business empire further & his 'public' can help him,while helping themselves of few premium pegs like emperor Napolean seen on the hoardings!!!
७)"every cloud has a silver lining!". अर्थात या विदेशी मद्यांच्या वाढत्या किंमतीमुळे देशी दारू उत्पादकांचा पण फ़ायदा होत आहे कारण ज्यांना विदेशी परवडत नाही ते देशाचा अभिमान बाळगून स्वस्त व मस्त "देशी"चे घुटके घेतात!
एकीकडे दुखःद बातम्या येत असतात देशी दारू पिउन किती देवाघरी गेले,दारूच्या व्यसनामुळे किती संसार उध्वस्त झाले,पण आपल्या अमाप लोकसंख्येच्या मानाने हे नगण्य आहे!
८)म्हणून मग आपले मायबाप सरकार गुटक्यावर,गांजा,अफ़ु यासारख्या drugs वरची बंदी उठवून आणखी महसूल जमा करण्याचा प्रयत्न कां करत नाही?असा महसूल वाढविता आला तर तोच महसूल त्यांना "आम जनते"च्या विकासासाठी वापरायला मिळेल!
हाच कां तो देश दारूबंदी जारी करणा-या महात्मा गांधींचा?दोन दिवसांपूर्वी त्यांचे तात्पुरते स्मरण करणा-यांना फ़ारच लवकर त्यांचे विस्मरण झालेले दिसत आहे.

Anonymous said...

मद्यसम्राट विजय मल्या यांचे विचार ग्रहणीय आहेत. ते किती देशप्रेमी आहेत याची खात्री होते. देशाच्या प्रगतीकरता किती आसुसले आहेत हेच यातुन दिसते. त्यांचे विचार शासनाने प्रत्यक्षात आणले तर खालिल फायदे होतील.
१. शासनाला अमाप उत्पन्न मिळेल.
२. सर्व जनता मद्यपानात धुंद राहिली तर कसलिही निदर्शने होणार नाहित. पोलिसांचे काम कमी होईल.
३. ज्याना हे मद्य परवडणार नाही ते देशी दारु पिवून धरतीचा भार कमी करतील. देशाची लोकसंख्या आटोक्यात राहील.
४. आणखीही खूप फायदे आहेत. नंतर सांगेन. इतरानीही या मध्ये भर घालावी व सकाळने ती शासनाकडे पाठवावी. व जनते तर्फे शासनाचे आभार मानावेत.

Unknown said...

Hi,I am manoj joshi from pune,vijay mallya yani je bolle te nakki chan ahe,pan apan jo tax wine sathi pay karto to tax public sathi use hot nahi,he je poticals ahet te nuste arguments kartat ki ya tax mule maharashtrala khup profite hoto,pan actully te selfish astat ya total profite cha use te swatasathi kartat,public sathi nahi karat.mag wine sarkhya bad habit sathi he karne totaly wrong ahe.mhanje ya madhe donhi side ne loss aapla hoto,ek tar young generation kharab hote,ani tax cha hi gain bhetat nahi,so i think it is totaly bad concept.

Anonymous said...

What he says is true to some extent.

seakade said...

He is not totally wrong.

Unknown said...

The thought is good one but government had to lower the tax so that more people can afford beer and can live more days than the by drinking deshi......

Anonymous said...

वा!छान! मल्ल्यासाहेब देशप्रेमी आणि कृषीप्रेमीही आहेत हे आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हते!
लोकांच्या रक्तात मद्य मिसळून देशाची महसूल वाढ व्हावी असे मल्ल्यांना वाटत असेल तर मल्ल्यांनीच आता महसूल मंत्रालयाचा कारभार हाती घ्यावा! देशाचा,राज्याचा महसूल वाढण्यासोबतच मल्ल्याजींचा खिसाही झिंगत जाईल. कृषीक्षेत्राला फायदा होणार हे भलतेच! शेतकरी बांधवाच्या आत्महत्येची आग विझवण्यासाठी आपल्या 'व्हिजनरी' 'सरकार' संस्थेला शेतक-यांच्या राखेत मद्य ओतावे लागेल ह्याला काय म्हणावे?

Anonymous said...

Wine chaya vikrine shasanache utpanna vadhel he manya, pan tya utpanna cha maharashtra jantela phyada naki honar ka? aaj paryent daru chaya vikri chech jasta utpanna milat ale ahe. tari hi mahrashtra pragati pathavar pahije tethe nahi. mukhay mude ase.
1. Shetkaryanchi atmahatya. tynchaya zamini kavdimol kimtene vikat ghenar ani na-upjau jamin badlyat denar.[udyogpati ani rajkarni asha kamat patait ahet]. mag sangha khanya sati pikwayche kuthe? ka nuste WINE peet rahayache. ek udyag vadhavinyasathi dusra udyog band padaycha.
2.yuwa pidhila ek prakare barbad karun takne. changalwadacha ajar lavane. tyamule navin josh, prerna ani khumak maharastrachaya bhavitavyasathi ani pragati sathi kothun milnar.

malya saheb tumhi Wine jarur vika pan ase vidhan karun nav-yugasamor chukicha adarsha nirman karu naka. aplya udyougabarober, naitikta mahnun samajic jababdari theva ashi amchi eechha ahe.
tumchaya mataa pramane wine mule maharashtrala jasta utpanna milte, dusra arth asa hota tumhala utpanna pan adhik milte. maharastra chaya pragati sathi kahi karayche asel tar ek gaon dathak ghyave ani tayacha vikas karava.

Anonymous said...

मल्ल्या साहेबाना विचारले तर त्यांचेकडे ऊत्पन्नवाढीच्या खूप कल्पना आहेत. त्यातील कांही खाली दिल्या आहेत.
१. बारबालाना पुन्हा नाचावयाला परवानगी देणे. तेथे गल्ल्यावर सरकारी कर्मचारी नेमून जो गल्ला जमेल त्याचा ठराविक भाग कर म्हणून शासनाच्या तिजोरीत जमा करणे. शासनाचे कर्मचारी विना मोबदला काम करण्यास तयार होतील. बघा उत्पन्न वाढेल व खर्चात बचत होईल.
२. शासनाने वारांगना आश्रम चालवावेत. ज्याला पाहिजे त्याने पैसे भरुन परवना घ्यावा. उत्पन्न वाढेल.
३. शासनाने भिका-याना परवाने द्यावेत व महसूल वाढवावा.
४. आत्महत्त्या करणारे शेतकरी नैसर्गिक कारणाने मेले असे दाखवून पैसे वाचवावेत.
५. असे किती तरी उपाय त्यांचेकडे आहेत. त्याना देशाचे पंतप्रधान बनवले तर भारत एका रात्रीत श्रीमंत देश होईल.

Unknown said...

It is rediculous that just to earn more revenu , Govt . should open its policy towards liquor.

The way drinking is getting status in our society is really worring and is causing harma to our society.

Anonymous said...

I agree with Yogesh. During my childhood drinking was considered as bad habit. Now it is gaining popularity and is becoming status symbol. However, we cannot depend on those who have drinks as their routine. Remember we elected them.